घटस्थापनेच्या मुहूर्तावर महाराष्ट्रातील मंदिरे भाविकांसाठी खुली करण्यात आली आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील महत्त्वाच्या मंदिरांमध्ये राज्याच्या मंत्रीमंडळातील मंत्र्यांनी पहाटेच जाऊन मंदिरे खुली करत दर्शन घेतले आहे. त्यानंतर आता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सपत्नीक मुंबईची कुलदैवत असणाऱ्या मुंबादेवीचे दर्शन घेतले. यावेळी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यादेखील उपस्थित होत्या.