Adul (Aurangabad) : दुमजली माळद कोसळून आजोबा व नात ठार तर नातु गंभीर जखमी
Adul (Aurangabad) : दुमजली माळद कोसळून आजोबा व नात यांचा कोसळलेल्या घराच्या मातीत दबुन मृत्यू झाला तर नातु हा गंभीर जखमी झाल्याची घटना घारेगाव (ता.पैठण) येथे शनिवारी (ता.२५) रोजी मध्यरात्री घडली. यात आई, आजी व नातु चे प्राण वाचले. घारेगाव ता. पैठण येथे जगदीश विठ्ठल थोरे वय ६० वर्षे हे शेतकरी कुटुंब आपल्या वडिलोपार्जित माळद (दुमजली इमारतीत) गेल्या अनेक वर्षांपासून राहतात. शनिवारी (ता.२५) रोजी मध्यरात्री घारेगाव परिसरात जोरदार अतिवृष्टी झाली. त्यात गेल्या चार पाच दिवसापासून सतत पाऊस पडत असल्याने या दुमजली माळदाच्या भिंतीत पावसाचे पाणी मुरले त्यामुळे राञी एक वाजेच्या सुमारास हि इमारत कोसळली.
( व्हिडिओ : शेख मुनाफ)
#adul #aurangabad