Lokmat Sports Update | आणि छोट्या उस्तदांची चमकदार कामगिरी, विश्वचषकात ऑस्ट्रेलिया ला केले चीत |

Lokmat 2021-09-13

Views 0

टीम इंडियाने अंडर-19 वर्ल्ड कप-2018 च्या पहिल्या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा 100 धावांना पराभव केला आहे.राहुल द्रविडच्या कोचिंगमध्ये खेळणारी भारतीय टीमने आधी बॅटींग करत 50 ओव्हरमध्ये 7 विकेट गमवत 328 रन बनवले. ऑस्ट्रेलिया च्या टीमने 42.5 ओव्हमध्ये 228 रन केले पण त्यासाठी त्यांनी सगळ्या विकेट गमवल्या.भारताकडून कमलेश नागरकोटी आणि शिवम मावीने 3-3 विकेट घेतले. तर अभिषेक शर्मा आणि अंकुल रॉय यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
भारताने धावांचा डोंगर उभारल्यानंतर त्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या कंगारू टीमची सुरुवात धिम्या गतीने झाली. भारतीय टीमकडून कर्णधार पृथ्वी शॉ 94 ची खेळी केली. पृथ्वीचं शतक हुकलं पण त्याच्या 94 रनच्या जोरावर भारताने विजय मिळवला.


आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS