बालेवाडी - खेलो इंडिया राष्ट्रीय हिवाळी स्पर्धा गुलमर्ग (जम्मू काश्मीर ) येथे (ता. 26 फेब्रु. ते 3 मार्च) दरम्यान पार पडल्या. या स्पर्धेमध्ये स्पीड आइस स्केटिंग या प्रकारांमध्ये महाराष्ट्राने उत्तम कामगिरी करत दोन सुवर्ण व दोन रोप्य पदके पटकावली.
गुलमर्ग (जम्मू कश्मीर) येथे नुकत्याच पार पडलेल्या खेलो इंडिया राष्ट्रीय हिवाळी स्पर्धा 2021 मध्ये बाणेरचा सुमित संजय तापकीर या स्केटर ने स्पीड आइस स्केटिंग मध्ये एक सुवर्णपदक व एक रौप्य पदक मिळवले. तर मुंबईच्या सोहन तारकर याने एक सुवर्णपदक व एक रौप्य पदक पटकावले.