औरंगाबादमधील जायकवाडी धरण 95 टक्के भरले आहे. धरणातील पाण्याची आवक अचानक वाढल्याने गुरुवारी (21 सप्टेंबर) रात्रीच्या सुमारास तातडीने धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला.यासाठी धरणाची 18 दरवाजे उघडण्यात आले होते. पाण्याचा हा विसर्ग पाहण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत.