दिव्यांगांच्या जागतिक जलतरण स्पर्धेत कांचनमाला पांडेला सुवर्णपदक | Lokmat Marathi News

Lokmat 2021-09-13

Views 0

मेक्सिकोमध्ये सुरू असलेल्या दिव्यांगांच्या जागतिक जलतरण स्पर्धेत नागपूरच्या कांचनमाला पांडे हिने सुवर्णपदकावर नाव कोरले आहे. हा पराक्रम करणारी ती पहिलीच भारतीय महिला ठरली आहे.
कांचनमाला ही 26 वर्षाची जलपरी दृष्टीहीन आहे. जुलै महिन्यात जर्मनीत झालेल्या पॅरा स्वीमिंग स्पर्धेत तिनं सहभाग घेतला होता. त्यावेळी सरकारने मंजूर केलेले पैसे तिच्यापर्यंत पोहोचू न शकल्याने तिला बर्लिनमध्ये अक्षरश: भीक मागावी लागली होती. या प्रतिकूल परिस्थितीतही जिद्द कायम ठेवून तिनं रौप्यपदक पटकावलं होते आणि जागतिक स्पर्धेसाठी ती पात्र ठरली होती.या कामगिरीने कांचनमालाला नवे बळ दिले. त्याच्या जोरावरच तिनं जागतिक स्पर्धेत न भुतो न भविष्यती कामगिरी करून दाखवली आहे. एस 11 गटातील 200 मीटर मेडले प्रकारात या जलपरीनं सुवर्णपदक पटकावलं. मी पदक जिंकेन, याची खात्री होतीच; पण या सोनेरी यशामुळे झालेला आनंद अवर्णनीयच आहे, अशा भावना तिने व्यक्त केल्या.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS