मराठवाड्यात १६ जानेवारीपासुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने होणाऱ्या हल्लाबोल यात्रेच्या तयारी साठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत रविवारी हिंगोलीच्या राष्ट्रवादी कार्यालयात पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. गर्दीचा फायदा उठवत चोरट्यांनी तीन कार्यकर्त्यांचे पाकीट मारत वीस हजाराच्यावर रक्कम लंपास केली. पोलिसांनी त्याच ठिकाणी एकाला ताब्यात घेतले तर अन्य एक जण पसार झाला. पकडलेल्या चोरट्याचे नाव संतोष शिंदे असून तो परभणी येथील रहिवाशी आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews