झारखंड राज्यातील रांचीमध्ये सोन्याच्या ५ नवीन खाणी सापडल्या आहेत. कुबासाल, सोनापेट, जारगो, सेरेंगडीह आणि जेलगडा येथे या खाणी सापडल्या आहेत. भारतीय भूगर्भ संशोधनच्या भूअभ्यास कांनी प्राथमिक तपासणीत या ५ ठिकाणी सोन्याची खाण असल्याची शक्यता वर्तवली आहे. खडकावरचे नमुने अभ्यासल्यानंतर येथे सोन्याच्या खाणी असल्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. यासाठी येथे जमिनी च्या आत संशोधन करण्यासाठी आर्थिक मदतीची आवश्यकता आहे. यासाठी अनेक कोटी रुपये खर्च येतो. यामुळे जीएसआय ने केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवला आहे ह्या प्रस्तावाला हिरवा कंदील मिळाला तर संपूर्ण योजना तयार केली जाईल. या अंतर्गत खडकांच्या रासायनिक तपासण्यामुळे हे ओळखण्यात येईल की कोणत्या प्रकारच्या सोने येथे उपलब्ध आहेत आणि कसे काढू शकतो. यासंपूर्ण प्रक्रियेला २ वर्ष लागू शकतात.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews