पोलंडच्या सेंट बर्थोलोमेव चर्च आहे .. कुडोवा शहरातील या चर्चची स्कल चापेल अशी आेळख आहे. चर्चच्या आतील भागात प्रार्थनेच्या ठिकाणी असलेल्या भिंती कवट्या आणि अस्थींनी मढवलेल्या आहेत. झेक प्रजासत्ताकच्या सीमेलगतच्या पर्वतरांगेत हे अनोखे कॅथॉलिक चर्च आहे.1776 पर्यंत महामारी व युद्धामुळे सुमारे 30 हजारावर लोकांचा मृत्यू झाला होता. दफन लोकांना योग्य सन्मान देण्यासाठी 1804 मध्ये हे चर्चची स्थापना झाली.चर्चमध्ये प्रार्थनास्थळी भिंतींवर 3 हजार कवट्या लावण्यात आलेल्या आहेत. तळघरात सुमारे 25 हजार लोकांच्या अस्थी आहेत. पोलंडमधील हे एकमेव अस्थी चर्च आहे.फादर रोमॅल्डड ब्रुदनोस्की यांनी 100 हून अधिक सहकाऱ्यांच्या मदतीने वार्षिक विधी पूर्ण केला फादर म्हणाले, ते म्हणाले, ‘येथे हजारो अज्ञात लोकांसाठी मी रोज प्रार्थना करतो. त्यांच्यावर ईश्वराने दया दाखवावी, ही माझी ईश्वराला प्रार्थना आहे
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews