महाविकास आघाडीला राऊतांनीच दिला धक्का? Sanjay Raut | Sharad Pawar | Devendra Fadnavis | Maharashtra

Lokmat 2021-09-13

Views 3

आधीच पोलिस दलातल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाने पिचलेल्या आघाडी सरकारला संजय राऊतांनी आणखी एक धक्का दिलाय... शरद पवार यांनी युपीएचं अध्यक्षपद भूषवायला हवं... युपीए सध्या वाईट अवस्थेत आहे, काँग्रेस नेतृत्वहीन झालंय वगैरे विधानं करून त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांना डिवचलंय.... त्यांच्या विधानाने आघाडीमध्ये पुन्हा नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे... पण या विधानाचं टायमिंग सुद्धा आपण तपासायला हवंय .... खरं म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेसच्या मौनावर आणि निष्क्रीयतेवर बोट ठेवलं होतं... राऊतांनी त्या आगीत तेल ओतलंय का?, असं आता राऊतांच्या भूमिकेमुळे वाटायला लागलंय .... असं का होतंय, हे आपण समजून घ्यायला हवंय... नमस्कार, मी गुरूप्रसाद ... तुम्ही पाहताय लोकमत... संजय राऊतांनी आज पत्रकारांशी बोलताना पुन्हा एकदा काँग्रेसला डिवचलं.... शरद पवारांकडे युपीएचं अध्यक्षपद सोपवावं, तेच प्रादेशिक पक्षांना एकत्र आणू शकतात... अशी विधानं त्यांनी केली... त्याची अपेक्षेनुसार तीव्र प्रतिक्रिया काँग्रेसमध्ये उमटलीय.... काँग्रेसचे नेते हुसेन दलवाई यांनी एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीत आपला राग व्यक्त केलाय...

#lokmat #SanjayRaut #SharadPawar #DevendraFadnavis #Mahavikasaghadi
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS