शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांच्या वादात आता संजय राऊत यांनी नवा बॉम्ब टाकला आहे. संजय राऊत गेल्या तीन दिवसांपासून किरीट सोमय्या यांच्याशी निगडीत युवक प्रतिष्ठानवर खळबळजनक आरोप करत आहेत. या संदर्भातील ट्विट्सची मालिकाच त्यांनी सुरू केली आहे. याचाच पुढचा भाग म्हणून आज संजय राऊत यांनी युवक प्रतिष्ठानला मोतीलाल ओसवाल कंपनीकडून लाखो रुपयांचा निधी मिळाला असल्याचा आरोप केला.