सध्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये एक वेगळाच ड्रामा पाहायला मिळतोय......आणि हा ड्रामा रंगतोय तो वन एण्ड ओन्ली कंगना रानौतमुळे.....रोज एक नवीन व्टिट आणि रोज एक नवा ड्रामा. आता या ड्रामा क्विनने आपल्या लेटे्स्ट व्टिटमध्ये लिहिलेय की, 'मी भांडण करणारी मुलगी वाटू शकते, पण हे सत्य नाहीये. माझा हा रेकॉर्ड आहे की, मी कधीही भांडणाची सुरूवात केलेली नाही. जर कुणी या गोष्टीला चुकीचं सिद्ध करेल तर मी ट्विट सोडेन. मी कधीच स्वत: भांडण सुरू करत नाही. पण संपवते मीच. भगवान श्रीकृष्णांनी म्हटलंय की जेव्हा कुणी तुमच्याशी भांडणासाठी तयार असेल तर तुम्ही कधीही त्यांना नाही म्हणू नये'.....मी क्षत्रिय आहे. डोके कापून घेऊ शकते पण झुकवू शकत नाही. राष्ट्राच्या सन्मानासाठी नेहमीच आवाज बुलंद ठेवेन. मान, सन्मान, स्वाभिमानासोबत जगले आहे आणि गर्वाने राष्ट्रवादी बनून जिंकत राहीन. तत्वांसोबत कधीच तडजोड केली नाही आणि कधी करणारही नाही. जय हिंद....कंगनाच्या या ट्विटवर दिग्दर्शक अुनराग कश्यपने रिट्विट करत लिहिले की, 'बस तू एकच आहे बहीण - एकुलती एक मणिकर्णिका. तू ना चार-पाच जणांना घेऊन चीनवर हल्ला कर. बघा किती आतपर्यंत जाऊन आले. त्यांना दाखवून दे की, जोपर्यंत तू आहे तोपर्यंत या देशांचं कुणी काही बिघडवू शकत नाही. तुझ्या घरापासून एक दिवसाचा प्रवास आहे LAC चा. जा वाघीण. जय हिंद'...अनुरागच्या या ट्विटवर पलटवार करत कंगना म्हणाली की, 'ठिक आहे मी जाते बॉर्डरवर. तू पुढील ऑलम्पिकमध्ये जा. देशाला गोल्ड मेडल हवंय. हाहाहा हा काही बी ग्रेड सिनेमा नाही जिथे कलाकार काहीही बनतो. तू तर मेटाफॉर्सला लिटलरी घेऊ लागला. इतका मंदबुद्धी कधीपासून झाला, जेव्हा आपली मैत्री होती तेव्हा तर फार चतुर होतास'...कंगनाची ही भांडण फक्त शाब्दिकच राहिली नाही तर मोडतोड पर्यंत गेलीत....अलिकडेच बीएमसीने तिच्या ऑफीसवर हातोडा घातला होता....या मोडतोडीचे फोटो कंगनाने व्टिटरवर शेअर केले आणि यात ती म्हणाली की,,,हा तिच्या स्वप्नांचा, सन्मानाचा आणि ध्यैर्याचा बलात्कार आहे.
#KanganaRanaut #Tweet #Lokmatcnxfilmy
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कार