एनकाऊटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा विरूध्द ठाकूर लढत लक्षणीय ठरणार
- प्रदीप शर्मा नालासोपाऱ्यातून शिवसेनेचे ऊमेदवार असण्याची शक्यता
- प्रदीप शर्मा यांनी यांनी सुरू केली मोर्चेबांधणी
- प्रदीप शर्मा विरूध्द क्षितीज ठाकूर किंवा हितेंद्र ठाकूर ऊभे राणहण्याची शक्यता
- विद्यमान आमदार क्षितीज ठाकूर यांच्यासमोर प्रदीप शर्मा यांचे कडवे आव्हान
राज्यात सगळ्यात चुरशीची आणि सर्वांचं लक्ष वेधून घेणारी लढत कुठे होणार असेल तर ती पालघर जिल्ह्यात ... एनकाउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांनी शिवबंधन बांधून लगेच नालासोपारा मतदारसंघात प्रचाराला सुरूवात केली आहे. या मतदारसंघात सध्या हितेंद्र ठाकूर यांचा मुलगा आणि जितेंद्र अर्थात भाई ठाकूर यांचा पुतण्या क्षितीज ठाकूर आमदार आहे. या संपूर्ण परिसरात भाई ठाकूर अर्थात जितेंद्र ठाकूर गँगचं वर्चस्व होतं. जितेंद्र ठाकूर सध्या जेलमधे आहे. पण तिथूनही त्यानी काही हत्या घडवून आणल्याचा आरोप आहे. ६० वर्षीय हितेंद्र ठाकूर हे सध्या वसईचे आमदार आहेत. पण मुलगा क्षितीज ठाकूर याला प्रदिप शर्माविरूध्दची निवडणूक अवघड जाणार असं वाटलं तर ते नालासोपाऱ्यातून उभे राहण्याची शक्यता आहे आणि मुलगा क्षितीज पाटील याला वसईचं तिकीट देण्याची शक्यता आहे.
हितेंद्र ठाकूर यांच्यावर अर्धा डझनपेक्षा जास्त केसेस आहेत. त्यात शस्त्रास्त्रांचा धाक दाखवणे, सार्वजनिक शांतता भंग करणे, सरकारी कामात अडथळा आणणे वगैरे केसेसचा समावेश आहे. त्यांना अजून एकाही केसमधे शिक्षा झालेली नाही. म्हणूनच ते निवडणूक लढवू शकतात.
भाई ठाकूर गँगचा या भागातला दबदबा आणि हितेंद्र ठाकूरनी स्थापन केलेली बहुजन विकास आघाडी यांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत कठीण असणार आहे. शिवसेनेनी पालघर जिल्ह्यावर वर्चस्व मिळवण्याचा चंग बांधला आहे.
पालघर जिल्ह्यात विधानसभेच्या एकूण ६ जागा आहेत. त्यापैकी तीन जागांवर बहुजन विकास आघाडी निवडून आली होती. त्यात वसईमधून पक्षाचे सस्थापक हितेंद्र ठाकूर, त्यांचा मुलगा क्षितीज नालासोपाऱ्यातून तर बोईसरमधून विलास तरे निवडून आले होते. पण विलास तरे यांनीा नुकताच शिवसेनेत प्रवेश केलाय. त्यामुळे बोईसरमधे तेच उमेदवार असतील. वसईमध्ये मागच्या निवडणूकीत हितेंद्र ठाकूरनी शिवसेना पु?