कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी संभाजी भिडे यांच्या अटकेच्या मागणीसाठी भारिप-बहुजन महासंघानं एल्गार मोर्चाचं आयोजन केले आहे. जिजामाता उद्यान ते विधान भवन दरम्यान मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, भारिपच्या एल्गार मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. तर दुसरीकडे, आझाद मैदानावरील आंदोलनास पोलिसांकडून मंजुरी देण्यात आली आहे.