सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडून घेतलेले कर्ज परत न केल्यामुळे डी.एस.कुलकर्णी ह्यांच्या सेनापती बापट रस्त्यावरील बंगल्याचा लिलाव करण्यात येणार आहे. पुणे शहरातील सेनापती बापट रस्त्यावरील चतुःश्रृंगी टेकडीला लागून हा बंगला आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियाने यासंबंधीची जाहिरात दिली आहे. डीएसके राहत असलेल्या या बंगल्याचा लिलाव येत्या ८ मार्चला होणार आहे. या बंगल्याची किंमत ६६ कोटी ३९ लाख रुपये ठेवण्यात आली आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews