अमिताभ बच्चन यांनी आतापर्यंत २०० हून अधिक सिनेमांत काम केलं आहे. ७६ वर्षीय अमिताभ यांनी तब्बल ४९ वर्षे सिनेसृष्टीत काम करत आहेत. मात्र, असं काय झालं की बिग बी अमिताभ बच्चन यांना जॉबसाठी अर्ज करावा लागला आहे.शनिवारी रात्री अमिताभ बच्चन यांनी आपला बायोडाटा सोशल मीडियात शेअर केला. त्यांची पोस्ट व्हायरल होण्यात जराही वेळ लागला नाही. अमिताभ यांनी एका इंग्रजी वृत्तपत्रातील आर्टिकलचा फोटो ट्विट करत सोशल मीडियावरुन कामासाठी अर्ज केला आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews