पॅडमॅन चित्रपटामुळे भारतीय जनमानसात जागृती होण्यास सुरूवात झाली आहे. परंतू पाकिस्तानामध्ये मात्र 'पॅडमॅन' बॅन झाला आहे. पॅडमॅन चित्रपटाचा विषय पाहता पाकिस्तान मध्ये या चित्रपटाला मंजुरी मिळालेली नाही. IMGC च्या अमजद राशिदने या चित्रपटाला विकत घेतले होते. मात्र ट्रेलर पाहिल्या नंतर चित्रपट इम्पोर्ट न करण्याचा सल्ला दिला आहे. 'मासिकपाळी' या विषयावरून पाकिस्तानामध्ये परिस्थिती बिघडू शकते. परिणामी या चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध करण्यात आला आहे.अभिनेता अक्षयकुमार 'पॅडमॅन' चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत झळकला आहे. त्याच्या सोबत अभिनेत्री सोनम कपूर आणि राधिका आपटेदेखील खास भूमिकेत आहे. तामिळनाडूच्या अरुणाचलम मुरुगनाथम यांनी सॅनिटरी पॅड बनवण्यासाठी खास मशीनची निर्मिती केली. त्यांचा संघर्ष रूपेरी पडद्यावर मांडण्यात आला आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews