गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी काही दिवसांपूर्वी मुलींच्या बीअर पिण्याच्या सवय आणि त्याचे वाढते प्रमाण यावर चिंता व्यक्त केली होती.याच पार्श्वभूमीवर दिल्लीतील कादंबरीकार कोटा निलिमा यांनी चक्क मनोहर पर्रिकरांना बीअर डेटला येण्याचे आमंत्रण दिले आहे. निलिमाने म्हणाल्या की समाजातील पितृसत्ताक पद्धती विरूद्ध आवाज उठवण्यासाठी ५ मार्चला गोव्यात येत आहे. या दिवशी सायंकाळी पाच वाजताची वेळ ठरवली आहे. काही महिला कार्यकर्त्यांसह मनोहर पर्रिकर यांच्या कार्यालयात उपस्थित राहणार आहे. तुमचा सज्जन आणि दयाळू स्वभाव मला माहित असल्याने मला खात्री आहे की, एक तर तुम्ही ही बीअर डेट रद्द कराल किंवा उपस्थित राहणार नाही. आम्ही तिथे उपस्थित असू, तुम्ही आमच्यावर विश्वास ठेऊ शकता. मला आशा आहे की तुम्ही आमची भेट घ्याल असेही निलिमा यांनी म्हटले आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews