गोव्यासाठी आनंदाची बातमी आहे. गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना आज लिलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असून ते गोव्यात दाखल झाले आहेत. आज सादर होणारा गोव्याचा अर्थसंकल्प ते स्वत: विधानसभेत मांडणार आहेत. स्वादुपिंडाला सूज आल्याने पर्रिकरांना लिलावतीमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्या अनुपस्थितीत सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री सुदिन ढवळीकर यांची विधानसभेच्या नेतेपदी नियुक्ती करण्यात आली होती.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews