Lokmat Bollywood News | Anupam kher यांचं Twitter Account झाले Hack, Pakistan च्या समर्थनार्थ Twitt

Lokmat 2021-09-13

Views 0

बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांचं ट्विटर अकाउंट हॅक झालं आहे. अनुपम खेर यांनी याबाबतची माहिती भारता तील ट्विटरच्या मुख्यालया ला दिली आहे. खेर यांनी दिलेल्या माहिती नंतर त्यांचं अकाउंट सस्पेंड करण्यात आलं आहे.अनुपम खेर यांचं अकाउंट तुर्कस्तानला हॅक झालं मात्र त्यांच्या अकाउंटवर ‘आय लव्ह पाकिस्तान’ सारखे ट्विट केले जात आहेत. हॅकर्सनी आपल्या पहिल्या ट्विटमध्ये लिहिलं की ‘तुमचं अकाउंट तुर्कस्तानातील सायबर आर्मी आइदिज तिमने हॅक केलं आहे. तुमचा सर्व महत्त्वाचा डेटा कॅप्चर करण्यात आला आहे.’ ट्विटच्या शेवटी हॅकर्सनी आय लव्ह पाकिस्तान लिहिलं आहे. हॅकर्सनी त्यानंतर अनुपम खेर यांच्या अकाउंटवर अनेक ट्विट केले आहे. सगळ्या ट्विट मध्ये ‘आय सपोर्ट तुर्की’ आणि ‘आय लव्ह पाकिस्तान’ लिहिलं आहे.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS