चित्रपटाच्या निर्मितीची घोषणा केल्यापासून वादात सापडलेला संजय लीला भन्साळी यांचा ‘पद्मावत’ या सिनेमावरच्या बंदीला सर्वोच्च न्यायालयानं गुरूवारी स्थगिती दिली. या चित्रपटावर चार राज्यांनी बंदी घातली होती. बंदीच्या कचाट्यातून ‘पद्मावत’ हा सिनेमा एकदाचा सुटला आणि याचा मला खूपच आनंद झाला आहे अशी प्रतिक्रिया अभिनेते नाना पाटेकर यांनी दिली आहे. ‘प्रत्येक चित्रपट हा प्रदर्शित व्हायलाच हवा. चित्रपट प्रदर्शनाच्यावेळी अनेकदा वाद होतात, पण चित्रपट योग्यरित्या तयार केला असेल, त्यात विषयाची मांडणी योग्यरितीनं केली असेल तर चित्रपट प्रदर्शित होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews