या तारखांना होणार मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक | Mumbai University News Update | Lokmat News

Lokmat 2021-09-13

Views 116

मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक ७ फेब्रुवारी रोजी होणार आहे. याबाबत विद्यापीठाने अधिसूचना जारी केली असून ९ फेब्रुवारी रोजी या निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. निवडणूक जाहीर झाल्याने आता राजकीय घडामोडींना वेग येणार आहे.

मुंबई विद्यापीठाच्या सिनेटवर महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ नुसार १० प्राचार्य, ६ व्यवस्थापन प्रतिनिधी, ३ विद्यापीठ अध्यापक आणि विविध अभ्यास मंडळांवर प्रत्येकी ३ महाविद्यालयीन विभागप्रमुखांच्या जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. या चार अधिकार मंडळांच्या निवडणुकीच्या अधिसूचनेनुसार उमेदवारांना २१ जानेवारीपर्यंत अर्ज सादर करता येणार आहे.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS