गतविजेत्या मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला 15, हार्दिक पंड्या 11 आणि बुमरासाठी 7 कोटी रुपये यांना खरेदी करण्यासाठी खर्च केले आहेत.मुंबईकडे आता लिलावासाठी 2 राईट टू मॅच आणि 47 कोटी रुपये बाकी आहेत. ही रक्कम आणखी कमी होऊ शकली असती, मात्र मुंबई इंडियन्सच्या हितासाठी रोहित शर्माने स्वतःची रक्कम कमी केली. रोहित शर्माने क्षेत्ररक्षणा सोबतच सगळीकडे दमदार कामगिरी केली आहे. तो फलंदाजांचं संतुलन साधण्यासाठी तिसऱ्या क्रमांकावर खेळण्यासाठीही तयार असतो. रोहितला जास्त किंमत दिल्यानंतर मुंबई इंडियन्सकडून क्रृणल पंड्याला रिटेन केलं जाणार होतं, मात्र रोहितने स्वतःची रक्कम कमी करुन हार्दिक पंड्याला रिटेन केलं.
पॉलिसीनुसार, रोहित शर्मालाही विराट कोहली एवढीच रक्कम मिळाली असती, मात्र त्याने संघाची चांगली बांधणी करता यावी, यासाठी स्वतःची रक्कम कमी केली, जेणेकरुन इतर चांगले खेळाडू घेता येतील.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews