अमेरिकेत बॉम्ब नावाच्या चक्रीवादळाने पूर्व किनाऱ्याला फटका दिला असून तेथे मोठय़ा प्रमाणात हिमवृष्टी होऊन गोठवणारी थंडी पडली आहे. काही ठिकाणी तर वाऱ्याचा वेग ताशी ८८.५ किलोमीटर असून तिथले तापमान उणे २९ अंश सेल्सियस इतके खाली गेले आहे. बर्फ सगळीकडे साचला असून ईशान्येकडे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. अनेक विमान उड्डाणे रद्द करण्यात आली असून शाळादेखील बंद ठेवण्यात आल्या आहेत. तर दुसरीकडे बॉम्ब या चक्रीवादळानं नायगरादेखील गोठला आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews