कुमारची अपकमिंग फिल्म पॅडमॅन 26 जानेवारीला रिलीज होत आहे. अरुणाचलम मुरुगनाथम या रियल कॅरेक्टरवर आधारित ही फिल्म आहे. मुरुगनाथम यांनी गावातील महिलांना स्वस्तात सॅनिटरी पॅड उपलब्ध करुन दिले होते. नुकत्याच एका मीडिया इंटरॅक्शनमध्ये अक्षयने खुलासा केला आहे की पीरियड्स या विषयावर माझा मुलगा आरवसोबत त्याची आई, ट्विंकल खन्ना मोकळेपणाने चर्चा करते. अक्षय म्हणाला की आपल्या देशात पीरियड या विषयावर आजही मोकळेपणाने बोलले जात नाही. आजही आपल्या देशात 82% महिला अशा आहेत ज्यांच्यापर्यंत सॅनेटरी पॅड पोहोचलेले नाहीत. जर आमच्या फिल्मच्या माध्यमातून 5% महिलांमध्येही याबद्दल जागरुकता निर्माण झाली तर आम्ही यशस्वी झालो असे मी मानतो. सॅनिटरी नॅपकिनचा खर्च सर्वसामान्य महिला करु शकत नाहीत, हे लक्षात आल्यानंतर अरुणाचलम मुरुगनाथम यांनी महिलांना स्वस्तात पॅड कसे उपलब्ध करुन देता येतील यावर काम सुरु केले. त्यामुळेच त्यांना पॅडमॅन म्हटले जाऊ लागले होते.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews