रामपूर लोकसभा मतदारसंघातील खासदार डॉ. नेपालसिंह यांनी सोमवारी वादग्रस्त वक्तव्य केल्याने अडचणीत आले. सीमेवर लष्करी जवान शहीद होत अाहेत. यावर जवान आहेत, ते तर मरणारच, असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. वाद अंगलट येत असल्याचे दिसताच नेपालसिंह माफी मागून मोकळे झाले. जवानांच्या हौतात्म्याचा अवमान करण्याचा माझा हेतू नव्हता, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.जम्मू-काश्मीरच्या सीमेवर लष्करी जवान नेहमी शहीद होतात यासंबंधीचा प्रश्न पत्रकारांनी विचारलेला होता. त्यावर वादग्रस्त उत्तर दिल्यामुळे उपस्थितांनाही आश्चर्याचा धक्का बसला. खासदारांच्या वक्तव्यास काँग्रेसने तीव्र आक्षेप घेतला होता. काँग्रेसचे सचिव व उत्तराखंडचे सहप्रभारी संजय कपूर यांनी म्हटले, हे भाजपच्या विचारसरणीचे द्योतक आहे. जवानांचा हा अवमान आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews