औरंगाबादसह देशातील ९ विमानतळांच्या नामांतराचा प्रस्ताव विचाराधीन असल्याची माहिती केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री अशोक गजपथी राजू यांनी मंगळवारी राज्यसभेत दिली. तामिळनाडूतील मदुराई आणि चंदिगड विमानतळांच्या नामांतराचा मुद्दा प्रश्नोत्तराच्या काळात उपस्थित करण्यात आला होता. या मुद्द्याच्या उत्तरात राजू यांनी ही माहिती दिली. औरंगाबादच्या चिकलठाणा येथील विमानतळाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्याची मागणी शिवसेनेकडून केली जात आहे. याबाबतचा प्रस्तावही केंद्र सरकारकडे दिलेला आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews