पश्चिम बंगालच्या हावडा इथं राहणा-या इशरतला तिच्या पतीने 2014 साली दुबईवरून फोन करून तलाक दिला होता. ट्रिपल तलाक हा बेकायदेशीर असून इशरतनं त्याविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती.
ट्रिपल तलाकविरोधात सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आलेल्या पाच याचिका कर्त्यांपैकी इशरत ही एक होती. आता तिने खुद्द भाजपा मध्ये प्रवेश केला आहे.ट्रिपल तलाकविरोधी विधेयक मंजूर झाल्याबद्दल इशरतने पंतप्रधान मोदींचे आभार मानलेत. तसंच भाजपमध्ये प्रवेश करुन चांगले वाटल्याची प्रतिक्रियाही तिने दिलीय.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews