१. चहामध्ये मोठ्या प्रमाणात रासायनिक घटक असतात. रात्रभर पोट रिकामे असल्याने त्यावर चहा प्यायल्यास अॅसिडिटी होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे आरोग्याच्या इतरही अनेक तक्रारी उद्भवण्याची शक्यता असते.
२. अनेकजण चहा पिणे घातक आहे हे माहित असल्याने दुधाचा चहा पितात. मात्र ज्यांना जास्त दुधाचा चहा आवडतो अशा लोकांना सकाळी असा चहा प्यायल्यावर थकवा येण्याची शक्यता असते.
३. अनेकांना कडक चहा प्यायला आवडतो. मात्र चहामध्ये पचनसंस्थेशी निगडीच तक्रारी निर्माण होतात. यामुळे आपल्याला पोटाशी निगडीत अनेक समस्या उद्भवतात.
४. भारतीयांमध्ये नाष्ता किंवा जेवणानंतरही चहा पिण्याची पद्धत आहे. मात्र हे तर आरोग्यासाठी जास्तच घातक असते.
५. अनेकजण दिवसातून अनेकदा चहा पितात. त्यामुळे भूक मरते.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews