भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी हा अनेकांच्या गळ्यातला ताविद आहे. अजूनही अनेक चाहते त्याला भारतीय संघाचा कर्णधार मानतात. धोनी उत्तम फलंदाज, चपळ क्षेत्ररक्षक, उत्तम निर्णय क्षमता, आणि उत्तम माणूस म्हणून ओळखला जातो. धोनी मैदानात कोणताही चमत्कार करू शकतो असे लोक मानतात. आपल्या कुशल डावपेचांनी हरलेला डाव तो पुन्हा जिंकू शकतो. असा भाबडा विश्वास त्याच्या चाहत्यांचा आहे. म्हणून सचिन तेंडूलकर नंतर धोनीचे चाहते त्याला क्रिकेटचा दुसरा देवच मानतात. अशा या धोनीच्या पायाशी एखाद्या चाहत्याने लोळण घातलं तर नवल वाटायला नको. श्रीलंका विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात क्षेत्ररक्षणासाठी उभा असलेल्या धोनीकडे एका चाहत्याने धाव घेतली. साक्षात धोनी सामोर उभा असल्याचं दिसतात या चाहता अक्षरशः पाया पडला. हे पाहून चाहत्यांनी मैदानात जल्लोष केला.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews