तूप खा आणि वजन घटवा होय हे सत्य आहे | Lokmat News

Lokmat 2021-09-13

Views 0

तूप खाल्यामुळेच वजन वाढतं हा समज चुकीचा आहे . गायीचं तूप स्वादिष्ट असण्या सोबतच वजन कमी करण्यासाठी, एनर्जी वाढवण्यासाठी, मानसिक स्वास्थ आणि त्वचेसाठी अत्यंत उपयुक्त असतं. गायीच्या देशी तुपामध्ये कॉन्जुगेटेड लिनोलिक अॅसिडचा समावेश असतो. हे अॅसिड शरिराचं वजन कमी करण्यासाठी प्रभावी मानलं जातं.त्यामुळेच योग्य प्रमाणात तुपाचं सेवन केल्यास वजन वाढण्याऐवजी ते कमी होतं.तुपामध्ये व्हिटॅमिन ए, डी आणि कॅल्शियम, मिनरल्स, पोटॅशियम यांसारखे अनेक पोषक तत्व असतात. त्यामुळे रोज देशी तूप खाल्ल्याने वात आणि पित्त याचा त्रास होत नाही, पचन क्रिया चांगली राहते. तसेच सांधेदुखीचा त्रास कमी होण्यास मदत होते.देशी तूप चेहऱ्यासाठी, त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर असते. अॅसिडीटीचा त्रास कमी करण्यासाठीही तूप उपयुक्त ठरतं. त्यामुळेच दररोजच्या जेवणात योग्य प्रमाणात गायीचं तूप घेणं फायदेशीर आहे.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS