गुजरात विधानसभेच्या निवडणूक प्रचारात विकासाच्या मुद्यावरून घमासान सुरू आहे. स्वच्छताही याच विकासाचा भाग आहे. नरेंद्र मोंदीनी देशभरात ' स्वच्छ भारत' अभियानाला सुरूवात केली आहे. त्या मध्ये अनेक सेलिब्रिटींनी देखील सहभाग घेतला.स्वच्छ भारत अभियान ही मोदींची महत्वाकांक्षी मोहीम आहे. मात्र त्याच्यांच गावात म्हणजे वडनगर मध्ये या मोहिमेला हरताळ फासला गेलाय. वडनगर नगरपालिकेच्या ढिम्म कारभारामुळे रोहीतवास या भागात महिलांना उघड्यावर शौचाला जावं लागतंय.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews