पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदी आज मुंबईतील विविध विकासकामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण करणार आहेत. मुंबईत येण्यापूर्वी पंतप्रधान कर्नाटकाच्या दौऱ्यावर असणार आहेत. कर्नाटकातून ते मुंबईत येतील. त्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपवर निशाणा साधला आहे. तसेच अनेक प्रकल्पाची योजना, पायाभरणी आणि सुरुवात आम्ही केली होती. त्यातील काही प्रकल्प आता पूर्ण झाले आहेत. त्यापैकी प्रमुख योजनांचं उद्घाटन करण्यासाठीच मोदी येत आहेत. हे शिवसेनेचं यश आहे, असंही राऊत म्हणाले.
#SanjayRaut #PMModi #Metro #DevendraFadnavis #BJP #Mumbai #Karnataka #NarendraModi #Shivsena #UddhavThackeray #SunilPrabhu