रत्नागिरी - शहरानजीकच्या कुवारबाव येथे जागुष्टे प्रशालेत दुसरे बालकुमार साहित्य संमेलन मुलांच्या उत्साही प्रतिसादात पार पडले. संमेलनाचे अध्यक्ष साहित्यिक आणि आडिवरे हायस्कूलचे मुख्याध्यापक सुनील दबडे यांनी व्हॉट्सअॅपपेक्षा थेट संवादावर भर देण्याचे आवाहन मुलांना केले. त्यांनी सांगितलेल्या गोष्टी आणि ठेक्यात सादर केलेल्या कविता यामुळे त्यांचे दीड तासांचे भाषण मुलांनी छान एन्जॉय केले. यावेळी ग्रंथदिंडी आणि ग्रंथप्रदर्शनही आयोजित करण्यात आले होते.
(व्हिडिओ - संदेश पवार)
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा - https://www.youtube.com/LokmatNews