ट्रूकॉलर, यूसी ब्राउजर, शेयर-इट, क्लीन मास्टर, 360° सिक्युरिटी, व्ही चॅट, व्हीबो यांसारख्या अनेक अॅप डिलीट करण्यास जवानांना सांगण्यात आले आहेत.
या अॅपचा वापर करून चीनकडून जवानांच्या मोबाईलमधील गोपनीय माहिती चोरण्यात येते, अशी धक्कादायक माहिती समोर आल्यानं सुरक्षायंत्रणेनं हे अॅप्लिकेशन तातडीनं डिलीट करण्याचे आदेश जवानांना दिला आहे.यापूर्वी गुगलनं प्ले स्टोअर मधून यूसी ब्राउजर हे अॅप्लिकेशन हटवलं होतं. भारत आणि कॅनडा यांसारख्या देशातून यूसी ब्राऊजरमधून महत्त्वाचा डेटा हॅकर्सकडून चोरी केला जातो, त्यानंतर या डेटाचा गैरवापर केला जातो असा आरोप दोन्ही देशांनी केला. तसेच या अॅपवर बंदी घालावी अशी मागणी भारतानं केली होती. म्हणूनच या प्रकरणाची चौकशी करून हेअॅप्लिकेशन प्ले स्टोअरमधून हटवण्याचा निर्णय गुगलकडून घेण्यात आला.काही दिवसांपूर्वी चिनी बनावटीचे फोनही कंपन्यांनी परत मागवले होते. या फोनमधूनही डेटा चोरीला जाण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. म्हणूनच सैन्याला शिओमीचे फोन शक्य असेल तर वापरू नका असंही काही महिन्यापूर्वी सांगण्यात आल्याचं समजतं.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews