छगन भुजबळ यांना बाहेर काढून भाजपमध्ये घेतील. भाजपला पैसे घेऊन येणारे राजकीय नेते पाहिजेत, असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलाय. माधव भंडारींसारखे नेते नको तर प्रसाद लाड आणि नारायण राणेंसारखे भ्रष्टाचारी नेते भाजपला हवे, असा घणाघातही त्यांनी केलाय.तर दुसरीकडे भुजबळांविषयी केलेलं वक्तव्य हे दिलीप कांबळे यांचं वैयक्तिक मत असल्याचं गिरीश महाजन यांनी सांगितलंय. कांबळे भुजबळांविषयी नेमकं काय बोलले हे माहित नसल्याचं सांगत त्यांनी हात वर केले.छगन भुजबळ... महाराष्ट्राच्या राजकारणातलं वादग्रस्त व्यक्तिमत्त्व.शिवसेनेतून राष्ट्रवादीपर्यंत आणि महापौरपदापासून उपमुख्यमंत्रीपदापर्यंत झेप घेणारे राजकीय नेते. मात्र गेल्या दोन वर्षांपासून ते तुरूंगात खितपत पडलेत. मनी लाँड्रिंग विरोधी कायद्याखाली अंमलबजावणी संचालनालयानं मार्च 2016 पासून छगन भुजबळ आणि त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांना अटक करून तुरुंगात टाकलंय.दीड वर्षं उलटली, पण भुजबळ काका-पुतण्यांना अजून जामीन मिळत नाहीय.अशा भुजबळांसाठी भाजपला अचानक प्रेमाचा पान्हा फुटलाय.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews