काँग्रेसचा जीएसटी म्हणजे ‘ग्रँड स्टूपीड थॉट’असल्याचे म्हणत मोदींनी राहूल गांधी आणि काँग्रेसकडून मांडण्यात येत असलेल्या जीएसटीच्या संकल्पनेची खिल्ली उडवली आहे. 18 टक्क्यांपेक्षा अधिक जीएसटी आकारण्यावरून मोदी सरकारला सातत्याने लक्ष्य करणाऱया राहुल गांधींनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खणखणीत प्रत्युत्तर दिले.जीवनावश्यक वस्तू आणि मद्यावर एकच कर लागणे,हे तर्काला धरून आहे का?,असा सवाल उपस्थित करत मोदींनी काँग्रेसचा मुद्दा खोडून काढण्यात प्रयत्न केला. काँग्रेसच्या नेत्यांनी आयुष्यभर गोरगरीब जनतेला लुटले.त्यामुळे काँग्रेसने जीएसटीला विरोध करणे स्वाभाविक आहे.मात्र,मला जनतेला इतक्या वर्षात त्यांच्याकडून लुटलेला प्रत्येक पैसा परत करायचा आहे,असे मोदींनी सांगितले.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews