सोशल मीडियावर सध्या काय पिकेल आणि काय फळाला येईल हे सांगता येणं कठीण आहे.भारतीय ववंशाचे गुगलचे सीईओ सुंदर पिचाई त्यांना बर्गरम स्लाइस या संदर्भात प्रश्न विचारले असता त्यांनी मोठ्या मार्मिक उत्तर दिले. ‘बर्गरमध्ये चीज स्लाईस हे पॅटीच्या खाली असावे, की वर?’ यावरुन सोशल मीडियावर वाद सुरू आहे. त्यातून गुगलच्या बर्गर इमोजीमध्ये चीज स्लाइस हे सर्वांत खाली दाखवण्यात आले आहे, तर अॅपलच्या बर्गर इमोजीमध्ये चीज स्लाइस हे सर्वांत वर दाखवण्यात आहेत, त्यामुळे अॅपलचे इमोजी बरोबर की गुगलचे? यावर चर्चा सुरू आहे. हा ‘गहन’ प्रश्न जेव्हा पिचाईपर्यंत पोहोचला तेव्हा त्यांनी मार्मिक उत्तर देत हा प्रश्न उडवून लावला. ‘जगातले सर्वात महत्त्वाचे मुद्दे बाजूला ठेवू आणि फक्त या विषयावर चर्चा करू’ असं ट्विट करून त्यांनी वाद तिथेच थांबवला.
बॅकडल मीडियाचे संस्थापक थॉमस बॅकडल यांनी गेल्या आठवड्यात गुगलच्या ‘बर्गर इमोजी’चा उल्लेख करून या चर्चेला तोंड फोडले होते, तेव्हा या क्षुल्लक मुद्द्यावर चर्चा करून वेळ वाया घालवणाऱ्यांचे सडेतोड उत्तर देत पिचाईंनी तोंड बंद केले. ‘बर्गरमध्ये चीज कुठे असावे, याविषयावर सर्वांचे एकमत झाले, तर आम्ही सोमवारी सर्व महत्त्वाचे मुद्दे बाजूला ठेवू आणि प्रश्नाला प्राधान्य देऊ,’ असं ट्विट करत या त्यांनी बॅकडलसह सगळ्यांना चिमटा काढला. पिचाईंचे ट्विट आतापर्यंत 14 हजार लोकांनी रिट्विट केलं, तर दीड हजारांहून अधिक लोकांनी यावर प्रतिक्रियाही नोंदवल्या आहेत.आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews