ठाण्यात एका पेट्रोल पंपावर मापात पाप करण्याचा प्रकार समोर आलाय.त्यामुळे संतापलेल्या ग्राहकांनी पेट्रोल पंप चालकाला मारहाण केली. तीन हात नाका येथील पेट्रोल पंपावर पेट्रोल भरायला गेलेल्या वाहनात पाणी आढळलं. दुचाकी वाहन चालकांनी बाईकमध्ये पेट्रोल भरल्यानंतर त्याच्या गाड्या बंद पडत असल्याचं निदर्शनास आलं.यावर काहींनी पेट्रोल टाकी उघडून पाहिली असताना त्यामधून रॉकेल, थिनरचा वास येत होता. तर काहींनी बाटलीत पेट्रोल काढून पाहिले तर काहींच्या बाटली पेट्रोलमध्ये भेसळ केल्याचं निदर्शनास आले तर पेट्रोल भरताना लिटर मागे चोरी होत असल्याचे ही मोजमाप केल्यावर आढळून आलं. त्यामुळे संतापलेल्या नागरिकांनी पेट्रोल पंप बंद पाडला.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews