चीनमध्ये काही दिवसांपूर्वीच पार पडलेल्या मिस वर्ल्ड स्पर्धेत भारताच्या मानुषी छिल्लरने बाजी मारली. मिस वर्ल्ड झाल्यानंतर मानुषीचे जगभरातून कौतुक होतेय.रविवारीच ती मुंबईत परतली. तिने आज सिद्धिविनायकाचे दर्शनही घेतले. मिस वर्ल्ड स्पर्धेत तिने दिलेल्या प्रश्नाच्या उत्तराने तिला मिस वर्ल्डचा ताज मिळवून दिला. पण मानुषीच्या डोक्यावर विराजमान झालेल्या या मुकुटाची किंमत तुम्हाला माहीत आहे का?या मुकुटाची किंमत आहे तब्बल 7,50,000 डॉलर रुपये. म्हणजेच भारतीय चलनातील 4,85,10,375 रुपये इतके.मानुषीला या स्पर्धेच्या अखेरीस एक प्रश्न विचारण्यात आला. जगात कोणत्या प्रोफेशनमध्ये पैसे आणि सन्मान अधिक मिळाला पाहिजे. यावर उत्तर देताना मानुषीने आई असे सांगितले. आई तिच्या मुलासाठी मोठा त्याग करते. त्यामुळे तिच्या त्यागाची किंमत नक्कीच पैशांमध्ये करता येणार नाही. मी माझ्या आईच्या खूप जवळ आहे, असे मानुषीने उत्तरात म्हटले होते.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews