भारतासाठी 17 वर्षांनंतर मिस वर्ल्ड हा किताब जिंकणाऱ्या मानुषी छिल्लरचे सध्या सर्व स्थरांतून कौतुक केले जात आहे. बॉलिवूडपासून ते पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत साऱ्यांनीच मानुषीचे अभिनंदन केले आहे. मोदी यांनी मानुषीला ट्विट करत आपला आनंद व्यक्त केला. एका रात्रीत स्टार झालेल्या मानुषीबद्दल आता प्रत्येकालाच जाणून घेण्याची इच्छा आहे. नुकताच तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत 2 वर्षांपूर्वी मानुषी कशी दिसत होती हे स्पष्ट दिसते. हा व्हिडिओ मानुषी एमबीबीएसच्या पहिल्या वर्षाला असतानाचा आहे. व्हिडिओत मानुषी म्हणते की, ‘देशभरातून झालेल्या वैद्यकीय परीक्षेतून माझी निवड झाली. मी काही 12 तास अभ्यास करणाऱ्यांपैकी नाही. मी 12 वीमध्ये असतानाच आयईपीएमटीच्या अभ्यासाची सुरूवात केली होती. वैद्यकीय परीक्षांमध्ये सर्वात कठीण काही वाटते तर ते फिजिक्स असते, त्यामुळेच तेव्हा मी रवी सरांकडे फिजिक्सच्या क्लासला जायचे.’
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews