गेल्या काही दिवसांपासून राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. या काळात त्वचा फुटायला लागते. तसेच त्वचा कोरडी झाल्याने अंगाला खाजही सुटायला लागते. मात्र, त्यामुळे आपली त्वचा खराब होण्याची शक्यता असते. परंतु, घरच्या घरी काही सोपे उपाय केल्यास या समस्येचे निराकरण होऊ शकते. पाहुयात त्वचेचा कोरडेपणा दूर होण्यासाठी काळजी घ्यायला हवी याविषयी….
थंडीत त्वचा कोरडी पडली की मॉश्चराइजर लावण्याचा पर्याय अनेकजण स्विकारतात. मात्र, त्यामुळे त्वचा आणखी कोरडी होते. याशिवाय आपण आंघोळीच्या वेळी अंगाला लावत असलेला साबण त्वचेच्या कोरडेपणासाठी कारणीभूत असतो. त्यामुळे थंडीत अंगाला साबण लावणे टाळावे. याऐवजी उटणे किंवा हळद, दूध आणि डाळीचे पीठ लावावे.थंडीत रात्री झोपताना अंगाला नारळाचे तेल लावून झोपा. हे तेल त्वचेत मुरते आणि त्वचेचा कोरडेपणा कमी होण्यास मदत होते. यामुळे सकाळी उठल्यावर त्वचा तितकी कोरडी न होता त्याला काही प्रमाणात मऊपणा येतो.व्हिनेगर हे त्वचेच्या कोरडेपणासाठी अतिशय उपयुक्त असते. कोरडेपणा निघून जाण्यासाठी हाताला व्हिनेगर लावून हात गरम पाण्याने धुवा आणि यामुळे तुमचे हात मुलायम होण्यास मदत होईल.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews