एक खास फेसपॅक. ज्यामुळे पिंपल्स, काळे डाग होतील नाहीसे | lokmat Beauty Tips| Lokmat News

Lokmat 2021-09-13

Views 0

त्वचेला सुंदर, मुलायम ठेवण्यासाठी आपण विविध उपाय करतो. पण तुम्ही कधी हळदीचा फेसपॅक ट्राय केलाय? मग रूक्ष झालेली त्वचेला सतेज करण्यासाठी पिंपल्सपासून सुटका करण्यासाठी तुम्ही हळदीचा फेस मास्क नक्कीच वापरू शकता.हळदीत अॅक्टिव कंपाऊंड कर्क्यूमिन असते. कर्क्यूमिन हे एक शक्तिशाली अँटी ऑक्सिडेंट आहे. तसेच हळदीत अँटी इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. यामुळे चेहऱ्यावरील डाग कमी करण्यासाठी मदत होते. त्याचबरोबर त्वचेत असलेले विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते.
हळद सुरक्षित असते. मात्र ती योग्य प्रमाणात वापरणे गरजेचे आहे. कारण त्याच्या अधिक प्रमाणामुळे जळजळ होऊ शकते. त्याचबरोबर गर्भवती महिलांनी अतिरिक्त हळदीचे सेवन करू नये. त्यामुळे गर्भाशयावर परिणाम होऊ शकतो.हळदीत पाणी, मध घालून पेस्ट बनवा आणि ती चेहऱ्यावर लावा. काही वेळाने पाण्याने चेहरा स्वच्छ करा. या पेस्टमध्ये तुम्ही दूधही घालू शकता.


आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS