झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येवू द्या’ चा लंडन दौऱ्यातील लाइव्ह शो रविवारी उत्साहात पार पडला. डॉ. निलेश साबळे, भाऊ कदम, कुशल बद्रिके, श्रेया बुगडे, सागर करंडे, भारत गणेशपुरे, अंकुर वाढवे या कलावंतांनी अप्रतिम सादरीकरण केले. त्यांच्या ‘ फारुळे बाई, पुणेरी बाई’ या गाजलेल्या व्यक्तिरेखांनी प्रेक्षकांना मनमुराद हसवले. यावेळी माझ्या नवऱ्याची बायको या सध्या गाजत असलेल्या मालिकेतील कलाकार म्हणजेच अभिजित खांडकेकर ,अनिता दाते आणि रसिका धबडगावकर यांच्याशी मनमुराद गप्पादेखील मारण्यात आल्या. लंडनमधील प्रख्यात ‘ ट्रोक्सी’ थिएटर मध्ये या शोचं आयोजन करण्यात आले होते. या व्यासपीठावर स्लम डॉग मिलेनियर मधील डॅनी बॉयल, व्हर्जिन ग्रुप मधील रिचर्ड ब्रास्निन अशा दिग्गाज लोकांनी शो केले आहेत.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews