जीएसटी दर सरकारने कमी केल्यामुळे अनेक वस्तूंच्या किमती खाली येणे अपेक्षित आहे. मात्र असे होत आहे का? याची तपासणी ग्राहकांनी करणे आवश्यक आहे. चॉकलेत पासून शाम्पू, शेविंग क्रीम पर्यंत 177 वस्तूंवरील जीएसटी कमी करण्यात आला असून त्याची अंबलबजावणी बुधवारपासून होवू लागली आहे. यामुळे वस्तू उत्पादकांनी त्यांच्या उत्पादनांच्या वेष्टनावर सुधारित किंमत लावली आहे ना हे तपासणे गरजेचे आहे. जीएसटी परिषदेने आतापर्यंत 200 वस्तूंवरील जीएसटी घटवला आहे. त्यापैकी 28 टक्के जीएसटी लागू असलेल्या 177 वस्तूंवरील जीएसटी कमी करून 18 टक्के करण्यात आला आहे. हा नवा दर मंगळवार पासून लागू करण्यात आला आहे. त्यामुळेच या सर्व वातुंच्या किंमती कमी होणे अपेक्षित आहे. त्यासाठी मुळ किंमतीवर सुधारित किंमतीचे स्टीकर लावणे किंवा किंमत छापणे हे उपाय करणे गरजेचे आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews