मोठ्या थाटामाटात सुरु करण्यात आलेल्या मोनो रेल्वेच्या दोन डब्यांना वडाळा येथील म्हैसूर कॉलनी स्थानकाजवळ आग लागल्याची घटना घडली आहे. पहाटे सव्वापाचच्या सुमारास हि घटना घडली. या आगीवर लगेचच म्हणजे पुढच्या अर्ध्या तासातच नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले. यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र या घटनेमुळे मोनोरेल्वे ची सेवा ठप्प झाली आहे. लोकल रेल्वे वरचा ताण कमी करण्यासाठी मोनो रेल्वे आणि मेट्रो रेल्वे सुरु करण्यात आली. ज्याने लोकल
रेल्वे आणि रस्त्यांवरचा ट्राफिक चा ताण बऱ्यापैकी कमी झाला. मोनो आणि मेट्रो मुळे प्रवास जरा सुखकर झाला. आता त्याच मोनो रेल्वेची सेवा काही काळापुरता खंडित झाल्यामुळे प्रवाश्यांचे हाल होत आहेत. आग विझवण्यात यश आल्यानंतर मोनोरेल्वे कारखान्यात नेण्यात आली.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews