दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील एक धावपट्टी बंद असल्याने व उत्तर भारतात धुक्याने थैमान घातल्याने मुंबई- दिल्लीदरम्यान उड्डाण करणाऱ्या विमानांची संख्या निम्म्यावर अाली अाहे. त्यामुळे एरवी या प्रवासासाठी लागणारे अडीच ते तीन हजार रुपये भाडे बुधवारी चक्क ६० हजार रुपयांपर्यंत वाढले हाेते. काही व्हीआयपी लोकांनी तर तब्बल १ लाख रूपये मोजून मुंबई दिल्ली तिकीटे खरेदी केल्याचे सांगितले गेले..देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी दिल्लीतीलच इंदिरा गांधी अांतरराष्ट्रीय विमानतळावरील तीन धावपटट्यांपैकी एक धावपट्टी मंगळवारपासून तीन दिवसांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबई- दिल्ली मार्गावरील दरराेजच्या ३७ विमान फेऱ्यांची संख्या कमी करून ती १८ पर्यंत घटवण्यात अाली. त्यातच उत्तर भारतात धुक्याने थैमान घातल्याने विमान उ्डडाण रद्द झाली आहेत. त्यामुळे मुंबई-दिल्ली प्रवास करणाऱ्यांना मोठा फटका बसत अाहे.अनेक सर्वसामान्य प्रवाशांना विमान प्रवास रद्द करून मनस्ताप सहन करावा लागला. अचानक भाडे वाढल्याने अनेकांनी मुंबई वा वापीहून राजधानी एक्स्प्रेसने दिल्लीला जाण्याचाच मार्ग अवलंबला आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews