तमिळ आणि हिंदी चित्रपट सुपरस्टार कमल हसन गेले अनेक दिवस वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. त्यांनी वक्तव्य केलेल्या हिंदू आतंकवादाचा मुद्दा सध्या खूप गाजत आहे. अनेक हिंदुत्वादी संघटनांनी त्यांच्याविरोधात केस दाखल केली आहे, ह्यावर आज कमल हसन ह्यांना आपली बाजू मांडावी लागली ते म्हणाले कि मी सुद्धा एका हिंदू परिवारातच जन्म घेतला आहे. मी हिंदू आतंकवाद हा शब्द उच्चारला नसून एक्सट्रीम हा शब्द वापरला होता. मी कुठल्याही धर्माच्या नावाने हिंसेच्या विरोधात आहे. ते एका तमिळ साप्ताहिकात मागच्या आठवड्यात छापण्यात आलेल्या त्यांच्या लेखावर वर बोलत होते. ते अजून बोलले कि अनेक लोकांना वाटत असेल कि मी आज नवीन पक्षाची स्थापना करेल परंतु अस काहीही नाही मला अजून बरेच काम करायचे आहे. आणि त्यांनी त्यांच्या चाहत्यांना सांगितले आहे कि माझ्या वाढदिवसाचा केक न कापता पुरात अडकलेल्या लोकांची मदत करा.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews