भूसावाळून फैजपूर कडे मद्याच्या बाटल्यांचे खोके घेवून जाणाऱ्या मालमोटारीचा पाडळसा गावाजवळील मोर नदीच्या पुलावर अॅक्सल तुटल्याने ती मोटार दुचाकीवर धडकली. या अपघातात शेतीकाम आटोपून दुचाकीवर घराकडे निघालेली मीराबाई भारंबे (वय ४३) हि महिला मालमोटारीखाली सापडून जागीच ठार झाली तर अन्य एक महिला तसेच दुचाकीचालक गंभीर जखमी झाले. या अपघाताची माहिती समजल्यानंतर स्थानिकांनी धाव घेतली. अपघातग्रस्त मालमोटारीतून काही मद्याच्या बाटल्यांचे खोके
जमिनीवर पडले होते. हि बाब लक्षात आल्यावर अपघातग्रस्तांना सोडून अनेकांनी तिकडे मोर्चा वळवला. मृत व जखमींकडे दुर्लक्ष करीत लोकांनी बाटल्या हाती घेवून पळ काढण्यास सुरवात केली. मद्य लुटण्यात रस्त्यावरून मार्गस्थ होणारे वाहनधारक आघाडीवर होते. काही वेळात ग्रामस्थांची गर्दी जमल्यावर हा प्रकार
थांबला.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews