विराट-मिताली झाले आहेत नंबर वन! | Virat Kohli Latest News | Mitali Raje Latest News | Cricket News

Lokmat 2021-09-13

Views 1

न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत दमदार कामगिरी करणार्‍या भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीचा डंका आयसीसीच्या क्रमवारीतसुद्धा वाजला असून, त्याने गमावलेले पहिले स्थान प्राप्‍त केले आहे. दुसरीकडे भारतीय महिला संघाची कर्णधार मिताली राजही महिलांच्या क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे. याशिवाय रोहित शर्मा आणि हरमनप्रीत कौर यांनाही टॉप टेनमध्ये स्थान मिळाले आहे. नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या आयसीसी वन-डे जागतिक क्रमवारीत फलंदाजांच्या यादीत विराट पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिविलियर्सला मागे टाकले आहे.

तर, दुसरीकडे भारतीय महिला संघाची कर्णधार मिताली राजही महिलांच्या क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे. 753 गुणांसह मिताली राजने क्रमवारीत पहिले स्थान पटकावले आहे. ऑस्ट्रेलियाची एलिस पेरी 725 गुणांसह दुसर्‍या, तर न्यूझीलंडची अ‍ॅमी सॅटरवेट 720 गुणांसह तिसर्‍या स्थानावर आहे. महिला विश्‍वचषकात केलेल्या खेळीचा मिताली राजला फायदा झाला आहे.

आयसीसीच्या वन-डे क्रमवारीतील
टॉप टेनमधील भारतीय पुरुष खेळाडू -
1) विराट कोहली - 889 गुण
7) रोहित शर्मा - 799 गुण

आयसीसीच्या वन-डे क्रमवारीतील
टॉप टेनमधील भारतीय महिला खेळाडू :
1) मिताली राज - 753 गुण
6) हरमनप्रीत कौर - 677 गुण

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS